तूच दे शिक्षा तिला रे माजली ही जिंदगी.
वचनेशी प्रेम केले हा म्हणे माझा गुन्हा,
जे नको ते, आज मजला बोलली ही जिंदगी.
मार्ग सत्याचा धरुनी आजवर चाललो,
साधना केली खरी पण त्यागली ही जिंदगी.
तीच ती नाती नव्याने गोड बोलू लागली,
संशयाने मग पुन्हा धास्तावली ही जिंदगी.