Wednesday, March 27, 2013

Pravas

काळोखाच्या पौलावाटे वरून
उजेडापर्यंत जाणारा रस्ता
बरीच वळण घेऊन जातो...
एखाद्या वळणावर मग 
कधी न थकणारा मी ..... क्षणभर विसावतो.
बघतो मागे वळून कापलेले बराच अंतर
अंधाराशी लढता लढता
धैर्याने निघालेला मी अधांतर
किती वेळा पडलो, किती वेळा ठेच लागली
याचं गणित कधीच जमला नाही.
वादळ तेव्हा भावनांचं शांतेत ही शमलं नाही.
पावसाच्या ठेम्बांसारखा  
नेमकं माझ्या डोळ्यात काहीतरी होतं
नंतर कळलं...
ते माझ्या वेदनाचं रुप होतं
मी त्या वेदनाचं अस्तित्व पुसून
पुन्हा उठून उभा राहतो
उजेडापर्यंत चालायचं आहे
असा मी त्या वेदनेला सांगतो.

वाटलाच एकटेपणा कधी रस्त्यात
तर मीच मला सोबत करतो
माझ्या अवती भवती मागे पुढे
मी....मी...आणि...मीचं असतो .....